मुंबई: बँक ग्राहकांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी आहे. देशातील सार्वजनिक आणि खासगी बँका १ नोव्हेंबरपासून अनेक बँकिंग सेवांवरील शुल्कात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयामुळे ऑनलाइन बँकिंग आणि इतर आवश्यक सेवा महाग होणार असून, याचा थेट फटका देशभरातील लाखो ग्राहकांना बसणार आहे.
ऑनलाइन सेवा शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
गेल्या दीड दशकात बँकिंग क्षेत्रात मोठे बदल झाले असले तरी, बँकांनी आता जवळपास प्रत्येक सेवेवर शुल्क आकारायला सुरुवात केली आहे. आता या शुल्कात आणखी वाढ केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ नोव्हेंबर २०२४ पासून होण्याची दाट शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सारख्या मोठ्या बँकांनी क्रेडिट कार्ड वापरावरील शुल्कांमध्ये बदल जाहीर केले आहेत, तर इतर बँकाही याच मार्गावर आहेत. या शुल्कवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे.
कोणत्या सेवेसाठी किती शुल्क वाढणार?
बँका विविध सेवांसाठी शुल्क आकारण्याच्या तयारीत आहेत. संभाव्य नवीन दर खालीलप्रमाणे असू शकतात:
-
SMS अलर्ट: प्रत्येक तिमाहीसाठी १० ते ३५ रुपये.
-
मोबाईल नंबर/ईमेल आयडी बदलणे: ५० रुपये.
-
डेबिट कार्ड देखभाल शुल्क (Annual Maintenance): २५० ते ८०० रुपये.
-
खाते देखभाल शुल्क: ५०० रुपये.
-
डुप्लिकेट पासबुक: १०० रुपये.
-
एंट्रीसह डुप्लिकेट पासबुक: प्रति पेज ५० रुपये.
-
चेक पेमेंट थांबवणे (Stop Payment): प्रति चेक २०० रुपये.
-
ग्राहकाच्या चुकीमुळे चेक परत येणे: १५० रुपये.
-
स्वाक्षरी पडताळणी (Signature Verification): १०० रुपये.
-
डिमांड ड्राफ्ट (५ ते १० हजार रुपयांपर्यंत): ७५ रुपये.
-
रिवॉर्ड पॉइंट्सवर शुल्क: एसबीआयने (SBI) क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स वापरून खरेदी केलेल्या उत्पादनांवर किंवा व्हाउचरवर ९९ रुपये शुल्क आकारणार असल्याचे जाहीर केले आहे.
या निर्णयामुळे आतापर्यंत मोफत किंवा कमी दरात मिळणाऱ्या अनेक सेवांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे बँकिंग व्यवहार करताना या नवीन शुल्कांची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे.